अमेरिकेची कार निर्माता कंपनी 'जनरल मोटर्स' आता एक अशी कार बाजारात उतरवण्याच्या प्रयत्नात आहे, ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो. या गाडीमध्ये ना गिअर आहे.ना ब्रेक.ना स्टिअरिंग.ही गाडी संपूर्णत: ऑटोनॉमस आहे. म्हणजेच चालकाला केवळ या गाडीत बसायचंय. आणखी काहीही करायचं नाही.गाडी आपोआपच तुम्हाला इच्छित स्थळी घेऊन जाईल. 'तुम्ही अशा जगाची कल्पना करा जिथं कोणतीही दुर्घटना घडणार नाही. स्टिअरिंग व्हिल आणि पॅडल्सला काढून सुरक्षित रुपात चौथ्या जेनरेशनची सेल्फ - ड्रायव्हिंग cruise AV आमच्या झिरो अॅक्सिडंटच्या व्हिजनमध्ये मदत करू शकते' अशी माहिती जनरल मोटर्सनं एका ट्विटद्वारे दिलीय. जनरल मोटर्सचं या गाडीचं प्रोडक्शन मॉडल तयार केलंय. परंतु, अमेरिकेच्या वाहतूक विभागकडून यासाठी परवानगी अजून बाकी आहे. या गाडीची २०१९ पर्यंत रोड टेस्ट पूर्ण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews